Blogधार्मिकनांदेड

Nagpanchami in Kankadi ; कांकाडी येथे नागपंचमी निमित्ताने अनेक महिलांसह भाविक भक्तांनी नागदेव मंदिरात घेतले दर्शन… – NNL

नवीन नांदे| नागपंचमी निमित्ताने पंचक्रोशीतील अनेक गावातील महिलांनी कांकाडी येथील नागदेव मंदिरात विधीवत पुजन करून दर्शन घेतले यावेळी ग्रामस्थ व विविध राजकीय पदाधिकारी यांनी यात्रेनिमित्त येणारे भाविकांचे स्वागत फलक लावुन केले तर मंदिर परिसरात खेळणी साहित्य पुजेची दुकाने, आकाश पाळणे यासह विविध दुकाने मोठ्या संख्येने थाटली होती.

नागपंचमी निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी कांकाडी येथे गेल्या अनेक वर्षापासून नागदेव मंदिर असून दरवर्षी येथे नागपंचमीला पंचक्रोशीतील अनेक गावातून महिला व भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते असते, याही वर्षी नागपंचमी निमित्ताने सकाळी पुजारी कार्तिक कमलाकर मगरे,यांनी विधीवत मुर्ती पुजन केल्यानंतर दर्शनासाठी खुले करण्यात आले, ग्रामपंचायत कार्यालय कांकाडीचे सरपंच शरद भवर उपसरपंच जनाबाई गोपाळराव वरतळे,यांच्या सह माजी सरपंच सुदीन बागल, हणमंत भवर, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश पाटील बागल, माजी तंटामुक्त अध्यक्ष दशरथ पाटील,तंटामुक्त माजी अध्यक्ष कैलास बागल, काळेश्वर बागल, मोतीराम कोणंके,व्यंकटी पवार,देवानंद हणवंते,आनंदा मगरे,गोविंद कानवटे व गावातील सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी व गावकरी यांनी ही दर्शन घेऊन भाविक भक्तांचे स्वागत केले.

यात्रे निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, व वाचक शाखेचे बालाजी दंतपाले यांनी पोलीस अमलंदार,महिला पोलीस, होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, पोलीस पाटील बाळु वाघमारे यांच्या सह गावकरी ,युवक यांनी ही भाविक भक्तांसाठी दर्शन रांग, पिण्याचे पाणी यासह अल्पोहार विविध ठिकाणी वाटप केले, तर मुख्य रस्त्यावर व गावात विविध राजकीय पक्ष यांच्या वतीने व ग्रामस्थांनी स्वागत फलक लावले, यात्रेनिमित्त मोठया प्रमाणात महिला सह भाविक भक्तांनी गर्दी केली होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button