उस्माननगर l ए.एम. बाॅन्सर नांदेड टिमचे जिल्हा शाखा प्रमुख कृष्णा गिरी व शाखा प्रमुख सद्दाम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सदैव कार्य प्रभावीपणे राबवत असल्याबद्दल नुकतेच नांदेड येथे भिमाकोरेगाव शोर्यदिन व मा.संजय भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ए.एम. बाॅन्सर नांदेड टिमचा आयोजक सामाजिक कार्यकर्ते राम भोकरे यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ए.एम. बाॅन्सर नांदेड ची टिम संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय, अभिनेत्री, अभिनेता , शासकीय स्तरावरील अधिकारी , प्रतिष्ठित नेता , यांना आल्या पासून ते बाहेर जाण्यापर्येत त्यांच्या आजू बाजूला उभे राहून एक देशभक्त म्हणून तटस्थपणे सेवा करताना दिसतात. मोठं मोठ्या कार्यक्रमात नेते मंडळी किंवा व्हीआयपी व्यक्तीना पहाण्यासाठी प्रचंड गर्दी असते.
त्याठिकाणी ए.एम. बाॅन्सर टिम सहकार्य होईल तेवढे तन.मन लावून सेवा बजावत असतात.त्यांच्या या कार्याची दखल नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते राम भोकरे यांनी १ जानेवारी रोजी भिमा कोरेगाव शोर्य दिनानिमित्त व मा.संजय भोकरे ( कवठेकर ) यांच्या वाढदिवसानिमित्त शाहीरी जलसा आयोजित केला होता. या ठिकाणी कार्यक्रमास हजारों च्या संख्येने लोकांची गर्दी उसळली होती.
यावेळी ए.एम.बाॅन्सर नांदेड टिम यांनी शेवट पर्यंत कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले त्यामुळे शाहीरी जलसाचे आयोजक व सर्व टिम च्या वतीने ए.एम.बाॅन्सर टिम नांदेडचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. यावेळी टिममध्ये शाखा प्रमुख कृष्णा गिरी , शेख सद्दाम , मोहम्मद अतिक , नागेश जाधव , सतिश पवार , इरफाण पठाण , कृष्णा कडबे ,रंजित सोनवणे , बालाजी कंधारे सोनू कंधारे , यांच्या सह अनेक बाॅन्सर कार्य प्रभावीपणे राबवत असतात.