HomeकरियरHarshada Dalve : नवोदय प्रवेश परीक्षेत हिमायतनगरच्या हर्षदा दळवेचे दैदिप्यमान यश; जिल्ह्यात...

Harshada Dalve : नवोदय प्रवेश परीक्षेत हिमायतनगरच्या हर्षदा दळवेचे दैदिप्यमान यश; जिल्ह्यात द्वितीय क्रमांक

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर येथील एस.टी. महामंडळ कर्मचारी दत्तात्रेय दळवे यांची कन्या कु. हर्षदा दत्तात्रेय दळवे हिने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत हिमायतनगरचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कु. हर्षदा ही सध्या हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव महाविद्यालयाच्या शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालात तिने नांदेड जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत दैदिप्यमान कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे शहरी भागातून तिने हिमायतनगर शहराचे नाव उंचावले आहे.

IMG 20260318 WA0026 Harshada Dalve : नवोदय प्रवेश परीक्षेत हिमायतनगरच्या हर्षदा दळवेचे दैदिप्यमान यश; जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
IMG 20260318 WA0025 Harshada Dalve : नवोदय प्रवेश परीक्षेत हिमायतनगरच्या हर्षदा दळवेचे दैदिप्यमान यश; जिल्ह्यात द्वितीय क्रमांक

अभ्यासातील सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हर्षदाने हे यश संपादन केले असल्याचे तिच्या शिक्षकांनी सांगितले. तिच्या या यशामागे आई-वडिलांचे मार्गदर्शन तसेच शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचेही सांगितले जात आहे.

हर्षदाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे शिक्षक, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच शहरातील नागरिकांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. लहान वयातच मिळवलेले हे यश भविष्यातील उज्ज्वल वाटचालीची नांदी ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments