Harshada Dalve : नवोदय प्रवेश परीक्षेत हिमायतनगरच्या हर्षदा दळवेचे दैदिप्यमान यश; जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर येथील एस.टी. महामंडळ कर्मचारी दत्तात्रेय दळवे यांची कन्या कु. हर्षदा दत्तात्रेय दळवे हिने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत हिमायतनगरचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कु. हर्षदा ही सध्या हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव महाविद्यालयाच्या शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालात तिने नांदेड जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत दैदिप्यमान कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे शहरी भागातून तिने हिमायतनगर शहराचे नाव उंचावले आहे.
अभ्यासातील सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हर्षदाने हे यश संपादन केले असल्याचे तिच्या शिक्षकांनी सांगितले. तिच्या या यशामागे आई-वडिलांचे मार्गदर्शन तसेच शाळेतील शिक्षकांचे मोलाचे म...

