नांदेड| नांदेड मनपातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासह कायम स्वछता व कंत्राटी कामगारांच्या मागण्याची सोडवूणूक करण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन च्या वतीने दिनांक 08/07/2025 रोजी मनपा कार्यालय समोर द्वार सभा घेऊन मागण्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. दिनांक 08/07/2025 पर्यंत मागण्याची सोडवूणूक न झाल्यास दिनांक 09/07/2025 रोजी एक दिवसाचे लाक्षणिक रजा (कामबंद) आंदोलन करून सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मनपा कार्याल्यावर मोर्चा काढून धरणे निदर्शने आंदोलन करण्याचे आयोजित केले आहे.


नांदेड मनपा प्रशासनाने नांदेड वाघाळा शहर मनपा कामगार कर्मचारी युनियनच्या निवेदनाची गांभीर्याने दाखल घेऊन दिनांक 04/07/2025 रोजी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या अध्येक्षतेखाली उपायुक्त श्रीमती सुप्रिया टवलारे,मु्खे लेखा व वित अधिकारी डॉ. जनार्धन पक्कवाने,सहायक आयुक्त ( स्वच्छता, आस्थापना ) जि एम सादिक, मु्खे स्वच्छता निरीक्षक वसीम तडवी,कर्मचारी युनियनच्या वतीने कॉ. गणेश शिंगे अध्यक्ष. सुमेध सूर्यवंशी, अमोल कसबे, सुमेध कंधारे, हे उपस्थित होते.

सदर मिटिंग मध्ये युनियच्या सर्व मागण्यावर सांगोपांग चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. युनियनच्या मागण्या पैकी एक मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महिन्याच्या 05 तारखेला निधी उपलब्धते नुसार निवृत्ती वेतन करण्याचे डॉ. जनार्दन पक्कवाने यांनी दिलेले आश्वासन शनिवार दि. 05 तारखेला निवृत्ती वेतन केले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुखद आनंदाचा धक्का लागला आहे. सर्व सेवानिवृत्त कर्मचार्यामध्ये आंनद पसरला आहे. कॉ गणेश शिंगे यांनी मनपा प्रशसनाचे जाहीर आभार मानले आहे.
