Airport police : विमानतळ पोलीस ठाण्याची कारवाई; ४.३३ लाखांची विदेशी दारू जप्त

नांदेड| पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड यांनी अवैध रित्या विदेशी दारु वाहतुक आणि विक्री करणारे व्यक्तीवर कार्यवाही करुन एकूण ४,३३,७२०-/ चा मुद्देमाल जप्त केलं आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीची अवैद्य धंदे करणार्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्हयातील अवैध व्यवसाय पुर्णतः बंद करण्यासंबधाने ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड जिल्हयातील अवैध व्यवसाय करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना केले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन विमानतळ यांनी अवैध दारु विक्री करणाऱ्याची गोपनीय माहितीवरुन दि २३/०७/२०२५ रोजी १६.२० वाजता आनंद नगर चौक ते वसंतराव नाईक चौकाकडे जाणारे रोडवर जिजाऊनगर पाटीजवळ नांदेड येथे उभे असलेल्या एका पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनिचे स्विफ्ट कार क्रमांक MH-४६-P-८७३८ किंमती ४,००,०००/ रु कारची तपासणी केली.

एक इसम कारचे डिक्कीमध्ये विविध कंपनिची विदेशी दारु किमती ३३,७२० रु. चा मुद्देमाल विनापरवाना बेकायदेशीर रित्या ताब्यात बाळगुन चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रुपेश जगदीशराव जैस्वाल वय ३८ वर्षे रा. इंदीरानगर बारड ता. मुदखेड जि. नांदेड असे सांगीतले. त्याचे ताब्यातील वाहनासह विदेशी दारु व कार एकुण किंमती ४,३३,७२००८ रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आली. तसेच त्याचेवर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. विमानतळ पोलिसांनी केलेल्या दमदार कामगिरी केल्या बद्दल अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button