HomeनांदेडThere was a scam : हिमायतनगर येथील पत्रकार भवन बांधकामाच्या निधीसह जागेची...

There was a scam : हिमायतनगर येथील पत्रकार भवन बांधकामाच्या निधीसह जागेची झाली पळवापळवी -NNL

हिमायतनगर| मागील ७ वर्षांपूर्वी हिमायतनगर शहरातील पत्रकार भवनासाठी जागा देऊन १४ लाखाचा निधी उपलब्ध करत उदघाटन देखील केले. मात्र पत्रकार भवन तर झालेच नाही, उलट बांधकामाच्या निधीसह जागेची पळवापळवी झाली असल्याने पत्रकार भावांचा प्रश्न रेंगाळला आहे. लोकप्रतिनिधीने सर्वसामान्य जनतेप्रमाणे पत्रकारांची दिशाभूल करून कोपराला गूळ लावण्याचं काम केलं आहे. याबाबत पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली असून, आगामी काळात लोकप्रतिनिधींना जाब विचारला जाईल असा ठरावच पत्रकारांनी सोमवारी झालेल्या वार्षिक बैठकीत घेतला आहे.

हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील मराठी पत्रकार संघटनेची वार्षिक बैठक हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर कार्यालयात दिनांक २१ सोमवारी जेष्ठ पत्रकार अशोक अनगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत ग्रामीण भागातील पत्रकाराना वार्तांकन व जाहिराती संकलन करताना येणाऱ्या अडी अडचणी, राजकीय पुढाऱ्यासह प्रशासकीय यंत्रणेकडून माहितीच्या बाबतीत दिला जाणार दुजाभाव, आगामी विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता, पत्रकारांची भूमिका या विषयावर विचार विनिमय करण्यात आला. यावेळी अनेक जेष्ठ पत्रकारांनी मार्गदर्शन करताना पत्रकार भवन का झाले नाही असा प्रश्न उपस्थित केला. पत्रकार भवन बांधकामाचे थाटात उदघाटन करून निधीसह जागा पळविल्या गेल्याबाबत उपस्थित सर्व पत्रकार बांधवानी नाराजी व्यक्त करत या प्रकारचा जाब विचारणाचा ठराव सर्वानुमते घेतला आहे.

IMG 20241021 144027 There was a scam : हिमायतनगर येथील पत्रकार भवन बांधकामाच्या निधीसह जागेची झाली पळवापळवी -NNL

राजकीय पुढारी आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. यासाठी सर्वानी एकजुटीने कायद्याच्या चौकटीत राहून समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पत्रकारांना आवश्यक ती माहिती पुरविली पाहिजे अन्यथा अधिकाऱ्याच्या विरोधात संघटनेच्या माध्यमातून जाब विचारण्यात येईल. दर महिन्याला विविध घडामोडी बाबत आढावा बैठक घेणे, पत्रकार भवन संदर्भात लोकप्रतिनिधीसह संबंधित अधिकारी यांना प्रलंबित भवनाच्या कामाबाबत जाब विचारने अडी ठराव घेण्यात आले. जुन्या अध्यक्षाचा कार्यकाळ संपल्याने नूतन अध्यक्ष निवडीसंदर्भात दिनांक २५ रोजी हिमायतनगर – टेभी रस्त्यावरील श्री साईबाबा मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

यावेळी मराठी पत्रकार सांघाचे जिल्हा संघटक प्रकाश जैन, डिजिटल मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल मादसवार, जेष्ठ पत्रकार अशोक अनगुलवार, कानबा पोपलवार, दत्ताभाऊ शिराने, पांडुरंग गाडगे, सय्यद मनानं भाई, संजय मुनेश्वर, ज्ञानेश्वर पंदलवाड, लक्ष्मण माने, अनिल भोरे, वसंत राठोड, दिलीप शिंदे, रवी राठोड, धम्मा मुनेश्वर, सदाशिव पतंगे, नागेश शिंदे, धोंडोपंत बनसोडे, गंगाधर पडवळे, गजानन चायल, नागोराव शिंदे, परमेश्वर सूर्यवंशी, अनिल नाईक, अंगद सुरोशे, संदीप कोमावार, आदींसह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments