Friday, May 15

Police take action : सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या बारा लोकांवर पोलिसाची कारवाई

देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरातील आरटीओ चेक पोस्ट आणि महाविद्यालयासमोर सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार्या बारा लोकावर नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर कारवाई करण्यात आली आहे.

महेश यादव मुनेश्वर, भुमलवार आकाश मामीलवार, सुमित सोनकांबळे, सिद्धार्थ भालेराव, धम्मपाल भुताळे, समेद भुताळे, हर्ष पुतळे, सुनील भुताळे, आकाश नरबागे, सुशील कुराडे, मल्हारी भुयारे, आशा बारा लोकावर सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भग करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कार्यावाही झाली आहे.

त्याच्या या कॄत्यामूळे परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने घटनेची गंभीर दखल घेऊन देगलूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या नेतृत्वाखाली डी. बी. पथक आणि महिला अंमलदार श्रीमंती रेहना शेख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सबधितावर त्वरीत कारवाई केली. सबधितावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली. आश प्रकारचे कॄत्य समाजात अशातता निर्माण करतात आणि कायद्याचे उत्ल्घन करणारे यावर कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा पोलीसानी दिले आहे, तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसाना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!