There was a scam : हिमायतनगर येथील पत्रकार भवन बांधकामाच्या निधीसह जागेची झाली पळवापळवी -NNL
हिमायतनगर| मागील ७ वर्षांपूर्वी हिमायतनगर शहरातील पत्रकार भवनासाठी जागा देऊन १४ लाखाचा निधी उपलब्ध करत उदघाटन देखील केले. मात्र पत्रकार भवन तर झालेच नाही, उलट बांधकामाच्या निधीसह जागेची पळवापळवी झाली असल्याने पत्रकार भावांचा प्रश्न रेंगाळला आहे. लोकप्रतिनिधीने सर्वसामान्य जनतेप्रमाणे पत्रकारांची दिशाभूल करून कोपराला गूळ लावण्याचं काम केलं आहे. याबाबत पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली असून, आगामी काळात लोकप्रतिनिधींना जाब विचारला जाईल असा ठरावच पत्रकारांनी सोमवारी झालेल्या वार्षिक बैठकीत घेतला आहे.
हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील मराठी पत्रकार संघटनेची वार्षिक बैठक हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर कार्यालयात दिनांक २१ सोमवारी जेष्ठ पत्रकार अशोक अनगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत ग्रामीण भागातील पत्रकाराना वार्तांकन व जाहिराती संकलन करताना येणाऱ्या अडी अडचणी, राजकीय पुढ...
