HomeनांदेडDr. Veerupaksha Maharaj : डॉ. वीरूपाक्ष महाराज भाजपकडून विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत...

Dr. Veerupaksha Maharaj : डॉ. वीरूपाक्ष महाराज भाजपकडून विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत – NNL

देगलूर, गंगाधर मठवाले| काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्यास विधानसभा निवडणुकीत डॉ. वीरूपाक्ष महाराज शिवाचार्य भाजपकडून विधानसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याची तयारी म्हणून कि काय त्यांनी मतदारसंघात जनतेची भेटी गाठी घेऊन एक प्रकारे प्रचारात उडी घेतल्याचे चित्र दिसु लागले आहे.

मागील काळात माजी आमदार स्व.रावसाहेब अतापुरकर यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याने देगलुर बिलोली विधानसभा मतदारसंघ डॉ. वीरूपाक्ष महाराज शिवाचार्य यांनी प्रचार करून पिजुन काढला होता. मात्र ऐन वेळी तिकिट वाटपात डॉ वीरूपाक्ष महाराज शिवाचार्याना डावलण्यात आले. त्यावेळी पुःडील निवडणुकीत संधी दिली जाईल असे सांगितले गेले होते.

sddefault 1 Dr. Veerupaksha Maharaj : डॉ. वीरूपाक्ष महाराज भाजपकडून विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत - NNL

त्यामुळे अवघ्या काही महिन्यावर होणारी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी ते सज्ज झाले आहे. यावेळी निवडणुकीतुन माघार घेणार नसल्याचे चित्र दिसु लागले आहे. सध्या ते संपूर्ण मतदार संघांतील भाजप कार्यकर्त्यांचे व समाजांचे भेटी गाठी घेऊन बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती आखात आहेत. भाजप कडून उमेदवारी मिळाल्यास निश्चितच ते विजयी होतील अशी दाट शक्यता जन्मांसातून वर्तवली जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments