देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात गणपती विसर्जन ईद ए मिलाप या सारखे उत्सव शांततेत पार पडली पाहिजे. यासाठी शांतता कमीटीची बैठक देगलूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मारोती मूढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी आयोजित करण्यात शांतता कमीटीच्या बैठकीसाठी गावातील अकरा गणेश मंडळांच्या अध्यक्षांना पाचरण करण्यात आले होते. त्यांना मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक मारोती मूढे म्हणाले कि, गणेश उत्सवात डीजी वापर करण्यास शासनाने बंदी केलेली आहे. त्यामुले कोणत्याही मंडळाने डीजे लावून वायफळ खर्च करू नये डीजे लावल्या कायद्यानुसार कडक कारवाई होईल असे खडसावून सांगितले.
तसेच शासनाच्या नियमानुसार वेळेच्या आत गणपतीं मूर्तीचे शांततेत विसर्जन शांततेत पार पाडावे. उत्सवाची परंपरा कायम ठेऊन कोणतेही गालबोट ना लागू देता उत्सव आनंदाने पार पडून पोलिसाना सहकार्य करावे असे आवाहन यावेळी सर्व मंडळांना व शांतता कमिटीच्या सदस्यांना केले.
बैठकीच्या सुरुवातीला देगलूर पोलिस स्टेशनला नव्याने रूजू झालेले पोलिस निरीक्षक मारोती मूढे यांचा ग्रामपंचायतच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील सरपंच प्रतीनिधी जयपाल कांबळे, उपसरपंच गणेश चामावार, भाजपाचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी कनकटे, राष्ट्रवादीचे मलनरेडी चितलवार, मलरेडी यालावार, बालाजी शातापुरे, अविनाश चितलवार, विश्वभर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गगारेडी कोटगिरे, गेरेडर व गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्त्यांचे उपस्थित होते.
सात दिवसांच्या गणपतींचे आनंदात विसर्जन
शहापूर येथील महालक्ष्मी गणेश मंडळांनी सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन शांततेत केले. सतत सात दिवस गणेशाचे सकाळ संध्याकाळी पूजाअर्चा, संस्कृतीक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन करून टाळ मृदंगाच्या गजरात गावांतील मुख्य रस्त्यावरून गणेशाची मिरवणूक काढली. गावालगत असलेल्या तलावात आरती पूजा करून गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा देत जाड अंतकरणाने गणपती बाप्पाला निरोप ज्ञेयात आला. यासाठी सजय पांचाळ, बापुजी कलहाळे, सचिन यालावार, दत्तू जाकोरे, मारोती पांचाळ, गणेश बेळकोने इत्यादींनी पूढाकार घेतला. विशेष म्हणजे मिरवणुकीत महिलांचा देखील सहभाग घेतला होता.