HomeनांदेडOm Bal Gopal Ganesh Mandal : शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे ओम बाल...

Om Bal Gopal Ganesh Mandal : शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे ओम बाल गोपाळ गणेश मंडळाच्या पुरीभाजी महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ

हिमायतनगर,अनिल मादसवार| सामाजिक बांधिलकी जोपासून वायफळ खर्चाची बचत करत शैक्षणिक कार्यात हिरीरीने सहभाग घेणारे एकमेव गणेश मंडळ म्हणजे हिमायतनगर शहरातील परमेश्वर गल्लीत असलेल्या ओम बाल गोपाळ गणेश मंडळाचे नाव समोर येत आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गणेशोत्सव आनंदाने साजरा करून उरलेल्या पैशातून जिल्हा परिषद शाळेला यावर्षी सीसीटीव्ही कैमरे बसून देण्याचा संकल्प केल्याने मंडळाच्या सदस्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. रविवारी गणेश मंडळाच्या वतीने पुरीभाजीच्या भव्य महाप्रसादाला पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली. तसेच अनेक नामवंत राजकीय नेत्यांनी भेटी देऊन श्रीचे दर्शन घेऊन मंडळाच्या कार्याचे अभिनंदन केले आहे.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहरात तब्बल ३० च्या आसपास गणेश मंडळांची स्थापना होते. यापैकी एक गणेश मंडळ असे आहे कि, उत्सवादरम्यान अनावश्यक खर्च टाळून शैक्षसणीक क्रांतीचा उपक्रम या मंडळाच्या सर्व सदस्यांनी गेल्या तीन वर्षांपासून हाती घेतला आहे. दरवर्षी हजारो भाविक भक्त या बाल गणेश मंडळाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात. उत्सवाच्या काळात मंडळाच्या वतीने धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले जात असल्याने देणगीदाराकडून देखील मंडळाला योगदान दिले जात आहे.

हिमायतनगर शहर व परिसरात एककीकडे गणेश विसर्जन मिरवणुकीत लाखोंच्या रुपयातून डीजे लावून मूर्तीसमोर धांगडधिंगाना घातला जात असताना… याच हिमायतनगर शहरात दुसरी बाजू म्हणजे शिवनेरी प्रतिष्ठानच्या ओम बाल गोपाळ गणेश मंडळाच्या नवतरुण युवकांनी सर्व मंडळांने आदर्श घ्यावा असा उपक्रम राबवित आहेत. हे त्यांचे तिसरे वर्ष असून, यावर्षी सुध्दा गणपती उत्सव आनंदाने साजरा करून “ओम बाल गोपाळ गणेश मंडळ” वाढोणाच्या सदस्यांनी उद्याची भावी पिढी घडविणारी आपली शैक्षणिक मातृसंस्था असलेल्या जि.प्र.प्रा.कन्या शाळेला आता सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कैमरे बसविणाचा संकल्प केलं आहे.

श्री च्या मिरवणुकीत कोणताही गाजा-वाजा न करता तसेच इतर अनावश्यक खर्च टाळून गत वर्षी शाळेतील एक वर्गखोलीला पुठी मारून रंगरंगोटी करून डिजिटल करण्यासाठी जवळपास वीस हजार (20,000) रूपये खर्च करण्यास पुढाकार घेतला होता. त्यापूर्वच्या वर्षी सुद्धा या मंडळाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा पोषण आहार खिचडी शिजवण्यासाठी एक मोठे पातेले आणि त्यावरची झाकणी जवळपास पंधरा हजार रुपये (15, 000) खर्चातून देऊ केले होते. तसेच शाळेतील प्रांगणात पेव्हर ब्लॉक करण्यासाठी सुद्धा या मंडळाचे खूप मोठे लाभले आहे. एकीकडे शासन जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या मार्गावर असताना हे मंडळ त्यापैकी एक शाळा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असेच म्हणावे लागेल.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments