HomeकृषीLumpy : हिमायतनगर तालुक्यात जनावरांना लंपी आजाराचा शिरकाव; लंपी आजाराने पळसपुर मध्ये...

Lumpy : हिमायतनगर तालुक्यात जनावरांना लंपी आजाराचा शिरकाव; लंपी आजाराने पळसपुर मध्ये एक जनावर दगावलं

हिमायतनगर| तालुक्यात जनावरांमध्ये लंपी आजाराचा शिरकाव सुरू झाल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पशुवैद्यकीय विभागाने या लंपी आजारांसाठी गावोगावी जाऊन लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. पळसपुर येथील शेतकऱ्यांचे जनावरं लंपी आजाराने दगावल्याची घटना घडली असुन शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने तातडीने यंत्रणा कामाला लावावी व तालुक्यातील सर्व जनावरांना लसीकरण करून लंपी आजारावर आळा घालावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील शेतकरी दगडू जाधव यांच्या मालकीच गायीला लंपी आजाराची लागन झाली होती. तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार देखील केले परंतु तिला लंपी आजाराने घेरल्याने मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, तालुक्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागाला असुन, अनेक जनावरांना लागणं झाली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असुन शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यातील घाण केरकचरा यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या घाणीमुळे व डासांच्या प्रार्दुभावाने जनावरांना लंपी आजाराचा फैलाव होत असल्याचे सांगितले जात आहे.

पशुवैधकीय आरोग्य विभागाने जनावरांच्या आरोग्यासाठी शेतकऱ्यांना लशीकरण व औषधी देण्याची नितांत गरज आहे. परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांना अद्यापही औषधी व या रोगावर नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना केल्या नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे तातडीने लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाऊले उचलावीत .अन्यथा लंपीचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही शेतकऱ्यांनी बोलून दाखविले आहे.

हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय अधिकारी योगेंद्र ऐवतीकर यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यात लंपी आजाराने जनावरांना घेराव घातला आहे. त्यासाठी आमच्या टीमसह मी ग्रामीण भागातील जवळपास विस गावांमध्ये जाऊन जनावरांना लसीकरण केले आहे. शेतकऱ्यांनी देखील जनावराची काळजी घ्यावी आपल्या शेतात जनावरे बांधण्यात येणाऱ्या गौठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी. कडू लिंबाच्या झाडांचे धूप करून डास राहणार नाही याची दक्षता घ्यावी. लंपी आजाराची लागन दिसुन आल्यास संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे .

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments