Peace Committee meeting concluded : देगलूर तालुक्यातील शहापूर येथे शांतता कमीटीची बैठक संपन्न -NNL
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात गणपती विसर्जन ईद ए मिलाप या सारखे उत्सव शांततेत पार पडली पाहिजे. यासाठी शांतता कमीटीची बैठक देगलूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मारोती मूढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी आयोजित करण्यात शांतता कमीटीच्या बैठकीसाठी गावातील अकरा गणेश मंडळांच्या अध्यक्षांना पाचरण करण्यात आले होते. त्यांना मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक मारोती मूढे म्हणाले कि, गणेश उत्सवात डीजी वापर करण्यास शासनाने बंदी केलेली आहे. त्यामुले कोणत्याही मंडळाने डीजे लावून वायफळ खर्च करू नये डीजे लावल्या कायद्यानुसार कडक कारवाई होईल असे खडसावून सांगितले.
तसेच शासनाच्या नियमानुसार वेळेच्या आत गणपतीं मूर्तीचे शांततेत विसर्जन शांततेत पार पाडावे. उत्सवाची परंपरा कायम ठेऊन कोणतेही गालबोट ना लागू देता उत्सव आनंदाने पार पडून पोलिसाना सहक...
