Friday, June 26

Nanded ; एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड या संस्थेतील विद्यार्थी सौरव तेली याची जगभरात प्रतिष्ठीत अश्या लिनक्स फॉउंडेशन मेंटरशिप प्रोग्राम – २०२५ साठी निवड

नवीन नांदेड l एस.जी.जी.एस.अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड या संस्थेतील विद्यार्थी सौरव तेली,अंतिम वर्ष संगणक अभियांत्रिकी या विद्यार्थ्यांची जगभरात प्रतिष्ठीत अश्या “लिनक्स फॉउंडेशन मेंटरशिप (एल.एफ.एक्स) प्रोग्राम – २०२५ टर्म – ३” अंतर्गत सी.एन.सी.एफ. – क्यूबआर्मर : ऑब्झर्व्हेबिलिटी स्पेक्ट्रम एन्हांसमेंट” या प्रकल्पासाठी निवड झाली आहे. १२ आठवड्याच्या इंटर्नशीप साठी श्री सौरव तेली यास रु. २.५ लाख (अंदाजे ३,००० डॉलर) स्टायपेंड मिळणार आहे.
जगभरातून हजारो विद्यार्थी (स्पर्धक) या निवड प्रक्रियेत सहभागी होतात. या कार्यक्रमाच्या अत्यंत स्पर्धात्मक निवड प्रक्रियेमुळे, त्यातून साधारणपने १०० ते १५० विद्यार्थी निवडले जातात.

या वरून या मध्ये किती चुरस असते हे लक्षात येते. “लिनक्स फॉउंडेशन मेंटरशिप साठी भारतातून मोजकेच विद्यार्थी निवडले गेले आहेत,त्या पैकी एक या संस्थेचा गुणवंत विद्यार्थी श्री सौरव तेली होय.
सौरव तेली हा “क्लाउड नेटीव्ह कॉम्पुटिंग फॉउंडेशन (सी. एन.सी.एफ.)” या प्रकल्पावर काम करणार आहे. संस्थेतील विद्यार्थ्याच्या या मानाच्या जागतिक स्थावरील दैदिप्यमान यशा बद्धल संस्थेला व संस्थेतील संगणक अभियांत्रिकी विभागाला गर्व आहे.सौरव तेली यांनी मिळवलेले हे यश म्हणजे श्री गुरुगोविंद सिंग अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या यशाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेलेला आहे. या यशा बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

एस.जी.जी.एस.अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड या संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी आय.ए. एस.यु.पी.एस.सी, गेट (ग्रॅज्युएट एप्टिट्यूट टेस्ट इन इंजीनियरिंग), महाराष्ट्र लोकसेवा आयोग,अशा अनेक मानाच्या परीक्षेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा,देश पातळीवरील स्पर्धा अशा अनेक स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवत आहेत,यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.गेल्याच वर्षी संस्थेतील विद्यार्थी श्री अनुज अग्रवाल व धिरेन म्हात्रे यांनी सुद्धा असीच स्टायपेंड मिळवली होती.संस्थेचे नियामक मंडळ,आणि संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांनी संस्थेची गुणवत्ता वाढवण्यासाठी घेत असलेले निर्णय व मार्गदर्शन तसेच संस्थेतील प्राध्यापक व विद्यार्थी यांची मेहनत या मुळेच हे शक्य होत आहे. यातून संस्थेची गुणवत्ता सिद्ध होते.

सौरव तेली यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष सुनीलजी रायठठ्ठा व नियामक मंडळाचे सर्व सदस्य, संचालक डॉ.मनेश कोकरे, विभाग प्रमुख प्रा.सुवर्णा बनसोडे, इंचार्ज रजिस्ट्रार डॉ.बी.आर.बोंबडे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.अभिजित नांदेडकर, रिसर्च एंड डेवलपमेंट अधिष्ठाता डॉ.अनिल गोंडे, सर्व अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!