Har Ghar Tiranga : नांदेड विभागात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा बाईक व सायकल रॅली

नांदेड| दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत हर घर तिरंगा अभियान 2025 च्या निमित्ताने दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, नांदेड येथे तिरंगा बाईक व सायकल रॅली तसेच तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून देशभक्तीचा संदेश दिला.

या रॅलीचे उद्घाटन प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. या प्रसंगी श्री. राजेंद्र कुमार मीणा, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड व सेल्वा कुमार, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी, नांदेड, तसेच केंद्रीय विद्यालय नांदेड चे प्राचार्य श्री अशोक कुमार विश्वकर्मा उपस्थित होते.

रॅली मध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्स च्या जवानांनी, स्काऊट्स आणि गाईड यांनी, केंद्रीय विद्यालय/नांदेड च्या विद्यार्थ्यांनी तसेच विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला. अधिकारी वर्गाने कर्मचाऱ्यांना आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज फडकावण्याचे आवाहन केले. या रॅलीद्वारे देशभक्तीची भावना, समाजातील सहभाग व तिरंग्याचा सन्मान करण्याचा संदेश सर्वत्र पोहोचविण्यात आला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button