नांदेड| दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी दुपारी दोन वाजता समस्त महिला पद्मशाली समाज धर्माबाद तर्फे श्री महर्षी मार्कंडेय देवस्थानम धर्माबाद येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम (Hali Kunkva program) संपन्न झाला.

सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. राधाबाई लालन्ना यम्मेवार हे होते. विशेष अतिथी म्हणून मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज संघटनेच्या महिला अध्यक्षा सौ. प्रणिताताई वसमतकर, युनायटेड पद्मशाली समाज संघटना नांदेड च्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रगतीताई निलपत्रेवार, सामाजिक कार्यकर्त्या सौ. संगीताताई सुरकुटलावार, धर्माबाद तालुका बीजेपी तालुकाध्यक्षा सौ. सुमा पटकोटलावार यांनी स्थान ग्रहण केले तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अनुराधा किशनराव तानुरकर, सौ. चक्रपाणि हनुमणलू सुरकुटवार, सौ. मीना अनंत तानुरकर, सौ. गोदावरी शिवानंद बिंगेवार, सौ.ललिता लक्ष्मणराव गादेवार, सौ. सुमनबाई गंगाधर चिलकेवार, सौ. अनुराधा रामलु पोन्नोड या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात श्री महालक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे पूजन व महर्षी मार्कंडेय यांच्या प्रतिमेचे पूजन फटाकड्यांच्या आतिषबाजीने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व समितीतील सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कु. श्रुती संतोष पेंडकर यांनी स्वागतम स्वागतम स्वागतम आपका हे सुमधुर आवाजात स्वागत गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. मंचावर उपस्थित अध्यक्ष, विशेष अतिथी व प्रमुख पाहुणे यांचे हळदी कुंकू समितीतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले. हळदी कुंकू कार्यक्रमाचे औचित्य साधून धर्माबाद तालुक्यातील तीन पद्मकण्यांचा गौरव करण्यात आला.

एमबीबीएस उत्तीर्ण होऊन नुकतेच एमडी साठी पुणे येथे निवड झालेल्या कु. डॉ. रितिका व्यंकटेश बत्तुलवार व किनवट येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत जनरल सर्जन कु. डॉ .पुजा लालू आरटवार आणि दिल्ली येथील परेडसाठी महाराष्ट्रातून निवड झालेल्या कु. भाग्यश्री जनार्धन गैनवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या विशेष अतिथी सौ. सुमा पटकुटलावार व सौ. संगीताताई सुरकुटलावार यांनी हळदी कुंकवाचे महत्त्व सांगितले . सौ. प्रगती निलपत्रेवार यांनी पद्मशाली समाजातील प्रगती विषयी विचार मांडले तर सौ. प्रणिता वसमतकर यांनी गीताच्या माध्यमातून सौभाग्याचे लेणे असलेले वाण या बाबतीचे महत्त्व पटवून दिले. सौ.स्वाती रमाकांत तिप्रेसवार यांनी घरोघरी जाऊन कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे स्वागत समितीच्या अध्यक्षा सौ.मधुरिमा साईनाथ सुरकुटवार व कोषाध्यक्षा सौ. लिखिता अशोक यम्मेवार यांनी केले.
हळदी कुंकू महिला समितीतर्फे उपस्थित सर्व महिलांना वाण देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे नाव सौ. गोदावरी राम सुरकुटवार यांनी सुचवले तर सौ. ज्योती सतीश गादेवार यांनी अनुमोदन दिले. डॉ. सौ. रिंकू राजू सुरकुटवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. सदर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचलन सौ. लता राम चिलकेवार यांनी केले तर आभार सौ. रंजना शंकर गंगुलवार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. मधुरिमा साईनाथ सुरकुटवार, सौ. शकुंतला संजय गैनवार, सौ. सरोजना शंकर अंकमवार,सौ. लिखिता अशोक यम्मेवार, सौ. निकिता दत्तात्रय गुरुपवार, सौ. सौम्या गणेश आरटवार, सौ. सविता चंद्रकांत दारणावार,सौ. पुष्पा व्यंकटेश बत्तुलवार, सौ शैलेजा साईनाथ अवधूतवार, सौ. सविता तुळशीराम जुन्नेवार, सौ. गोदावरी राम सुरकुटवार, सौ. ममता विठ्ठल सिरमलवार, सौ. पुष्पा जगन्नाथ पुलकंठवार, सौ. धनलक्ष्मी सुरेश द्रोपतवार, सौ. नागमणी सतीश जडेलवार, सौ. संगीता गंगाधर गोकावार, सौ. अनुराधा गंगाधर सुरकुटवार, आणि समितीतील इतर सदस्यांनी प्रयत्न केले. उपस्थित सर्वांनी अल्पोपहार घेतल्यानंतर सौ. राधाबाई लालन्ना यम्मेवार यांनी अध्यक्षीय समारोप करून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.