Hali Kunkva program : महिला पद्मशाली समाज धर्माबाद तर्फे श्री महर्षी मार्कंडेय देवस्थानम धर्माबाद येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न
नांदेड| दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी दुपारी दोन वाजता समस्त महिला पद्मशाली समाज धर्माबाद तर्फे श्री महर्षी मार्कंडेय देवस्थानम धर्माबाद येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम (Hali Kunkva program) संपन्न झाला.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. राधाबाई लालन्ना यम्मेवार हे होते. विशेष अतिथी म्हणून मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज संघटनेच्या महिला अध्यक्षा सौ. प्रणिताताई वसमतकर, युनायटेड पद्मशाली समाज संघटना नांदेड च्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रगतीताई निलपत्रेवार, सामाजिक कार्यकर्त्या सौ. संगीताताई सुरकुटलावार, धर्माबाद तालुका बीजेपी तालुकाध्यक्षा सौ. सुमा पटकोटलावार यांनी स्थान ग्रहण केले तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अनुराधा किशनराव तानुरकर, सौ. चक्रपाणि हनुमणलू सुरकुटवार, सौ. मीना अनंत तानुरकर, सौ. गोदावरी शिवानंद बिंगेवार, सौ.ललिता लक्ष्मणराव गादेवार, सौ. सुमनबाई गंगाधर...
