HomeनांदेडThe sound of the trumpet at the wedding : एच एम.साखरे यांच्या...

The sound of the trumpet at the wedding : एच एम.साखरे यांच्या मुलीच्या लग्नात टाळ मृदूंगाचा गजर

नांदेड l शुभ विवाह सोहळायात लोप पावत चाललेलाआध्यात्म,फोपावलेली बुवाबाजी,प्रचंड प्रमाणात होणारे प्रदूषण,अन्न नासाडी या सर्व गोष्टीना प्रतिबंध करत महाराष्ट्रला लाभलेली संत परंपरेची आठवण शारदा भवन‌ शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा‌ बाबानगर‌ येथील कार्यरत एच.एम.साखरे यांनी आपल्या मुलीचा‌ साखरे व‌ हुंबे या शुभविवाह सोहळ्यात पाहायला मिळाली.

माझ्या लग्नात वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ असावे आणि आम्ही श्री विठ्ठल मूर्ती घेऊन लग्न मंडपात प्रवेश करणार अशी खुद वधू रितू उर्फ राणीची इच्छा होती आणि त्याप्रमाणे मग वारकरी सांप्रदायाच्या भजनी मंडळाची व्यवस्था मुलीचे वडील साखरे यांनी केली.विठ्ठलाची प्रथम पूजा गुराखी व धनगराने केली अशी नोंद आहे.याच अनुषंगाने धनगर समाज हा विठ्ठलाचा प्रथम भक्त आहे.

ज्या प्रमाणणे विठ्ठल भक्त हा प्रामाणिक आणि आत्म्यातून सेवा करणारा असतो त्याचप्रमाणे एच.एम. साखरे हे संस्थेची,चव्हाण कुटुंबी यांची,प्रामाणिकपणे आत्म्यातून सेवा करतात, संस्थेच्या कार्यालयात ते दररोज असतात,नवीन आधुनिक, वैज्ञानिक पद्धतीने विचार करणाऱ्या पैकी आहेत,त्यांच्या लग्नामध्ये धुराच्या हंड्या, फटाके, मिरवणूक मध्ये नाचणे,अन्न नासाडी,पाहायला मिळाली नाही.विशेष म्हणजे आज काल आपण पाहतो लग्न वेळेवर लागत नाहीत परंतु चि.सौ.रितू ऊर्फ राणी हिरामण साखरे व‌ चि.सुरजकुमार दादाराव हुंबे यांचा शुभविवाह 16जुंन25 रोजी नांदेड येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालय तरोडा बुद्रुक नांदेड येथे 11.35 वेळेवर म्हणजे ठरलेल्या मुहूर्तावरच झाले.

त्यामुळे सर्वांनाच वेळेवर आल्याचे समाधान वाटले, पर्यावरणाचा समतोल राखून,वेळेचे बंधन पाळून आणि विठ्ठल भक्तीच्या गजरात,एक वेगळ्या आणि आवश्यक अश्या चांगल्या समाज प्रबोधक उपक्रमाची सुरवात साखरे कुटुंबियांनी या लग्नाच्या माध्यमातून करून दिली. यामध्ये गुरुवर्य विनायक स्वामी यांचे लग्न जमवण्या पासून ते लग्न होई पर्यंत मोलाचे आशीर्वाद मार्गदर्शन व सहकार्य लाभले . यामध्ये साखरे यांची सहकार्यवृत्ती व सामंजस्य स्वभावामुळे त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये आपण होऊन त्यांच्या मित्र परिवाराने त्यांना आर्थिक व श्रमरुपी मदत केली. यामध्ये मावले, डोंगरे, के.आर.सय्यद, पांचाळ, शिंदे,यांचा समावेश आहे. त्याच बरोबर शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण माजी आमदार अमिता भाभी चव्हाण,माजी आ.डी.पी.सावंत, शेंदारकार, निंबाळकर ,श्रीजया ताई चव्हाण, .सुजयाताई चव्हाण,नरेंद्र दादा चव्हाण यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले,तर संस्थेतील सर्व सहकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले

या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझ्या मुलींचे लग्न कोणताही बडेजावपणा न करता प्रिवेडिंग च्या व्यतिरिक्त झाले या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे. अशी भावना साखरे यांनी बोलून दाखवली.खर तर आजच्या कलियुगात जाहीपणे प्रसार माध्यमात आपल्याला केलेल्या सहकार्याची भावना प्रसारीत करणे फारसे कोणाला जमत नाही मात्र हा प्रामाणिकपणा एच.एम साखरे यांच्याकडे आहे हे खुप कौतुकास्पद आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments