Wednesday, May 13

Marathon competition : हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत हिमायतनगर नगरपंचायत तर्फे मॅरेथॉन स्पर्धा

हिमायतनगर, अनिल मादसवार│ हर घर तिरंगा अभियानाच्या अनुषंगाने हिमायतनगर नगरपंचायतच्या वतीने मंगळवारी उमरखेड रोड वरद विनायक मंदिर परिसरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शहर व परिसरातील शाळा–महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाला तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी सौ पल्लवी टेमकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, तिरंग्याबद्दलची जाणीव आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा याविषयी मार्गदर्शन केले. नगरपंचायतीचे अधिकारी, शिक्षकवर्ग आणि नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती.

IMG 20250813 155957 Marathon competition : हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत हिमायतनगर नगरपंचायत तर्फे मॅरेथॉन स्पर्धा

हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा, राजा भगीरथ विद्यालय आदी शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी नगरपंचायत प्रशासन, क्रीडा समन्वयक व स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमानंतर सर्वांनी हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!