HomeनांदेडKinwat Camps : विधी साक्षर करण्यासाठी कायदेविषयक शिबीर महत्वाचे : न्यायाधीश पी.एम....

Kinwat Camps : विधी साक्षर करण्यासाठी कायदेविषयक शिबीर महत्वाचे : न्यायाधीश पी.एम. माने यांचे प्रतिपादन

किनवट| जनतेला विधी साक्षर करण्यासाठी कायदेविषयक शिबीर महत्वाचे असते.उपेक्षीत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायदेविषयक शिबीरे घेण्यात येतात. १५१०० ही विधी सेवेसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे,त्याचा लाभ जनतेंनी घ्यावा, असे आवाहन न्यायाधीश पी.एम. माने यांनी यांनी केले.

तालुका विधी सेवा समिती व वकील संघामार्फत जागतिक आदिवासी दिनानिमित्त भिलगाव(ता.किनवट) येथे आज(दि.९) सकाळी ११ वाजता कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी अध्यक्षीय समारोप ते करतानां बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहदिवाणी न्यायाधीश के. जी. मेंढे,वकील संघाचे अध्यक्ष ॲड. किशोर मुनेश्वर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. वाघमारे व सरपंच रेश्मा मंगाम, वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. राहुल सोनकांबळे , माजी उपाध्यक्ष ॲड. टी.एच.कुरेशी व तालुका विधी सेवा समितीचे सदस्य ॲड.मिलिंद सर्पे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे घुसाडी नृत्याने स्वागत करण्यात आले.

नंतर भगवान बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. वाघमारे,विधी सेवा समितीचे सदस्य ॲड. पंडीत घुले व ॲड.विलास सूर्यवंशी यांनी विविध कायद्यांची याप्रसंगी यथोचित माहिती दिली.प्रास्ताविक ॲड. सचिन तलांडे यांनी गोंडी भाषेतून केले.विलास शामिले यांनी सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शनही केले.

या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी शेख मुजाहीद,श्री.जाधव, उपसरपंच श्रीकांत सलाम ,पोलीस पाटील रवींद्र कुमरे ,ग्रामसेवक एस. एस‌. बंडे ,विजय मंगाम ,राधाबाई सलाम, आशिष पुसनाके, देवराव आत्राम ,भारत चौधरी ,संजय कुमरे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यात महीलांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर बिरसा मुंडा चौकाचे पुजन करण्यात आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments