Railway employee : नांदेड विभागात रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे सहकाऱ्याचे प्राण वाचले
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात 19 सप्टेंबर रोजी घडलेल्या धाडसी प्रसंगात रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे एका सहकाऱ्याचे प्राण वाचले.
कर्तव्यावर असताना शुभाष आर. राठोड (OS/कार्मिक विभाग) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. या गंभीर स्थितीत तातडीने मदतीची गरज असताना, तेथे उपस्थित असलेले महारुद्र दिगोले (Sr. Section Officer/लेखा विभाग तसेच Civil Defence Instructor, SCR) यांनी त्वरित CPR दिला व श्वसनमार्ग साफ करून राठोड यांचे प्राण वाचवले.
दिगोले यांनी NDRF नागपूर व Civil Defence/SCR संस्थेतून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या धैर्य, कौशल्य व तत्परतेमुळे सहकाऱ्याचे प्राण वाचणे शक्य झाले.
यानंतर राठोड यांना नारायणा मल्टिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या प्रसंगी महेंद्र पकळे (Ch.OS) यांनीही महत्...


