नांदेड| पोलीस अधीक्षक नांदेड यांचे विशेष पथकांनी संशयीत राशनचा तांदुळ व ट्रक असा एकुण 26 लक्ष 20 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कार्यवाहीमुळे रेषांचा कला बाजार करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.


पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation flush out) अंतर्गत जिवनावश्यक वस्तु कायदा नुसार कार्यवाही करण्याबाबत विशेष पथकांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत विशेष पथकातील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार हे अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोस्टे रामतिर्थ हद्दीतील शंकरनगर रोडवरून एक आयचर ट्रक क्रमांक एमएच-26/बीई 7012 मध्ये संशयीत राशनचा तांदळाचे कट्टे घेवुन जात आहे.


तात्काळ त्या ठिकाणी पोहंचुन पोलिसांच्या विशेष पथकाने सदरचा ट्रक थांबवुन चौकशी केली असता आत 17 टन तांदुळ किंमती 4,20,000/- रू चा व आयचर वाहन किंमती 22,00,000/- रू असा एकुण 26,20,000/-रू चा संशयीत माल मिळुन आल्याने ट्रक चालकास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन रामतिर्थ यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर प्रकरणी पुरवठा विभागास पत्रव्यवहार करून अहवाल प्राप्त करून पुढील कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे.


सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, उदय खंडेराय, पोनि स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील व्ही. एस. आरसेवार, सपोनि, पोहेकों बालाजी पोतदार, सोनबा मुंडकर, पोना कृष्णा तलवारे, पोकों नारायण येंगाले, अनिल वाघमारे यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



