the ration rice truck : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकांनी राशनच्या तांदळाचा ट्रक पकडला; 26 लक्ष 20 हजाराचा मुद्देमाल ताब्यात -NNL
नांदेड| पोलीस अधीक्षक नांदेड यांचे विशेष पथकांनी संशयीत राशनचा तांदुळ व ट्रक असा एकुण 26 लक्ष 20 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कार्यवाहीमुळे रेषांचा कला बाजार करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation flush out) अंतर्गत जिवनावश्यक वस्तु कायदा नुसार कार्यवाही करण्याबाबत विशेष पथकांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत विशेष पथकातील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार हे अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोस्टे रामतिर्थ हद्दीतील शंकरनगर रोडवरून एक आयचर ट्रक क्रमांक एमएच-26/बीई 7012 मध्ये संशयीत राशनचा तांदळाचे कट्टे घेवुन जात आहे.
तात्काळ त्या ठिकाणी पोहंचुन पोलिसांच्या विशेष पथकाने सदरचा ट्रक थांबवुन चौकशी केली असता आत 17 टन तांदुळ किंमती 4,20,000/- रू चा...
