हिंगोली| हिंगोली जिल्हयाचे सुपूत्र श्री सुमित संजयराव मस्के यांची इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन येथे डाटा सायन्स विषयातील उच्च शिक्षणासाठी निवड झाली असून पुढील आठवड्यात ते ब्लूमिंगटन येथे उच्च शिक्षणासाठी रवाना होणार आहेत
श्री सुमित मस्के यांनी छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज या महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे, त्यांनी सादर केलेला प्रस्ताव हा इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन येथे डेटा सायन्समधील पदव्युत्तर कार्यक्रमासाठी स्वीकारला गेला आहे. श्री सुमित यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे येथून प्रथम श्रेणीतील ग्रेड सह पदवीधर होऊन संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बी.टेक पूर्ण केले आहे.
डाटा सायन्स च्या उच्च शिक्षणासाठी त्यांना इंडियान युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन व्यतिरिक्त, ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी, रटगर्स युनिव्हर्सिटी न्यू ब्रन्सविक, न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेअर, स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ बफेलो, पेस युनिव्हर्सिटी ,इलिनॉयस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिकागो सह अनेक प्रतिष्ठित संस्थांकडून एकाच वेळी विविध ऑफर मिळाल्या होत्या
जागतिक स्तरावरील दर्जेदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रत्येक संस्थेने श्री सुमित यांना एकाचवेळी दिलेल्या संधींमुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी योग्य विद्यापीठ निवडणे हा एक कठीण निर्णय होता,” असे सांगताना श्री सुमित पुढे स्पष्ट करतात की भरपूर विचारा अंती मी आता इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टनमध्ये सामील होण्यास उत्सुक आहे, जिथे मी डेटा सायन्समध्ये माझे ज्ञान आणि कौशल्ये वाढवण्यास उत्सुक आहे.”
माझ्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात कुटुंब, मित्र आणि मार्गदर्शक यांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. ही नवीन संधी मला डेटा सायन्सच्या क्षेत्रात रोमांचक संधी असून पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात माझ्या उज्वल भविष्याची नांदी ठरेल असा आशावाद शेवटी श्री सुमिज संजयराव मस्के हे व्यक्त करतात ..
त्यांच्या या यशाबद्ल व पुढील उज्वल शैक्षणिक वाटचालीबद्दल
आजोबा संभाजी गणपतराव कर्ले, आजी सर्व प्रयागबाई संभाजीराव करले,यांच्यासह आई सौ जयश्री संजय राव मस्के, माधव राजाराम धुळगंडे, ज्ञानेश्वर रावसाहेब बिडगर,मनोहर सखाराम लवटे,गजानन संभाजी कर्ले ,संग्राम माधवराव धुळगंडे, अनिल माधवराव धुळगंडे ,नितीन माधवराव धुळगंडे ,तिरुपती संभाजी कर्ले, आशा मनोहर लवटे, शालिनी गजानन कर्ले, मंजुश्री तिरुपती कर्ले यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच््छा दिल्या आहेत