Sumit Sanjay Rao Muske ; सुमित संजयराव मस्के यांची इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन येथे निवड … – NNL
हिंगोली| हिंगोली जिल्हयाचे सुपूत्र श्री सुमित संजयराव मस्के यांची इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन येथे डाटा सायन्स विषयातील उच्च शिक्षणासाठी निवड झाली असून पुढील आठवड्यात ते ब्लूमिंगटन येथे उच्च शिक्षणासाठी रवाना होणार आहेत
श्री सुमित मस्के यांनी छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज या महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे, त्यांनी सादर केलेला प्रस्ताव हा इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन येथे डेटा सायन्समधील पदव्युत्तर कार्यक्रमासाठी स्वीकारला गेला आहे. श्री सुमित यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे येथून प्रथम श्रेणीतील ग्रेड सह पदवीधर होऊन संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बी.टेक पूर्ण केले आहे.
डाटा सायन्स च्या उच्च शिक्षणासाठी त्यांना इंडियान युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन व्यतिरिक्त, ॲरिझोना स्टेट युनिव्हर्...
