HomeकरियरEnglish communication : स्वारातीम विद्यापीठात इंग्रजी संवाद कौशल्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू

English communication : स्वारातीम विद्यापीठात इंग्रजी संवाद कौशल्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील संवाद कौशल्य केंद्राच्या वतीने इंग्रजी संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी ‘सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश फॉर कम्युनिकेशन’ हा नवीन ब्लेंडेड (ऑनलाईन + ऑफलाईन) अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यामधून विद्यार्थी, गृहिणी, कर्मचारी तसेच प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींना व्यावसायिक पातळीवर इंग्रजी शिकण्याची संधी मिळणार असल्याची माहिती प्र. कुलसचिव प्रा. ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.

एप्रिल ते जून या कालावधीत चालणारा हा तीन महिन्यांचा (एकूण ६० तास) अभ्यासक्रम असून, यात ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन (LSRW) या चारही कौशल्यांवर विशेष भर देण्यात येणार आहे. बारावी उत्तीर्ण असलेली कोणतीही व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी पात्र आहे.

या अभ्यासक्रमाद्वारे औपचारिक व अनौपचारिक संभाषणात आत्मविश्वास वाढवणे, शब्दसंपत्ती समृद्ध करणे आणि विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा तसेच विविध व्यवसायांसाठी हा अभ्यासक्रम विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.

विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी शिकण्याची ही चांगली संधी असल्याने इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. दिलीप चव्हाण (संवाद कौशल्य केंद्र) यांच्याशी ९४२०६४१५१९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments