Wednesday, May 13

Tag: Certificate course

English communication : स्वारातीम विद्यापीठात इंग्रजी संवाद कौशल्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू

English communication : स्वारातीम विद्यापीठात इंग्रजी संवाद कौशल्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील संवाद कौशल्य केंद्राच्या वतीने इंग्रजी संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी ‘सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश फॉर कम्युनिकेशन’ हा नवीन ब्लेंडेड (ऑनलाईन + ऑफलाईन) अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यामधून विद्यार्थी, गृहिणी, कर्मचारी तसेच प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींना व्यावसायिक पातळीवर इंग्रजी शिकण्याची संधी मिळणार असल्याची माहिती प्र. कुलसचिव प्रा. ज्ञानेश्वर पवार यांनी दिली. एप्रिल ते जून या कालावधीत चालणारा हा तीन महिन्यांचा (एकूण ६० तास) अभ्यासक्रम असून, यात ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन (LSRW) या चारही कौशल्यांवर विशेष भर देण्यात येणार आहे. बारावी उत्तीर्ण असलेली कोणतीही व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी पात्र आहे. या अभ्यासक्रमाद्वारे औपचारिक व अनौपचारिक संभाषणात आत्मविश्वास वाढवणे, शब्दसंपत्ती समृद्ध करणे आणि विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित करणे हे...
error: Content is protected !!