हिमायतनगर| क्रांतिकारी संत कबीर यांची जयंती व राष्ट्रीय फेस्टिवल कार्यक्रमात बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष पत्रकारत्रिरत्नकुमार मा.भवरे कामारीकर यांना त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक पत्रकारिता आदी क्षेत्रातिल उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते क्रांतिकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समिती कामठी जिल्हा नागपूर द्वारा आयोजित क्रांतिकारी संत कबीर यांची 627 जयंती व राष्ट्रीय फेस्टिवल 2025 चे आयोजन दिनांक 11 जून 2025 रोजी सिद्धार्थ विहार प्रांगण भीमनगर कामठी जिल्हा नागपूर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक दिलीप नेवसे पाटील तर प्रमुख पाहुणे शत्रुघन प्रसाद सिंह सत्यशोधक शिवदास महाजन प्रदीप फुलझले राजू मेश्राम अँड .मयूर बोरकर लोकेश कटारिया गायत्री रामटेके मुरली मधुठेलम तर स्वागतअध्यक्ष कवी साहित्य गझलकार मधुबावलकर आदिलाबाद यांच्यासह आदिची उपस्थिती राहणार आहे.

होणाऱ्या क्रांतिकारी संत कबीर यांची जयंती व राष्ट्रीय फेस्टिवल कार्यक्रमात बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष पत्रकारत्रिरत्नकुमार मा.भवरे कामारीकर यांना त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक पत्रकारिता आदी क्षेत्रातिल उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते क्रांतिकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. भवरे यांनी नांदेड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील तेलंगणा राज्यातील नवोदित कलावंतांना व्यासपीठ मिळवून दिले आहे.

ते दरवर्षी मोठमोठे कलावंताचे शाहिरी मेळावे कला महोत्सव व धम्म परिषद घेऊन कलावंताचा सन्मानपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरव करतात कलावंताच्या न्याय हक्का करता सदैव तत्पर असतात कलावंताच्या अडीअडचणी मागण्याबाबत त्यांनी अनेक आंदोलन केले व त्या आंदोलनाला यश ही आले आणि कलावंताला त्यांनी न्याय मिळवून दिला म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्रात कलावंत प्रेमी आदराने घेतात त्याना नांदेड जिल्ह्यात कलावंताचे आधारस्तंभ म्हणुन त्यांची खाती आहे. अशा या अवलिया कवी गायक पत्रकार ते त्रिरत्नकुमार मा .भवरे यांना क्रांतिकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून, 11 जून रोजी कामठी जिल्हा नागपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

भवरे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे पत्रकार शंकरसिह ठाकुर, मारोती शिकारे, परमेश्वर गोपतवाड, अनिल मादसवार, अनिलभाऊ भौरे, गोविंद गोडसेलवार, आनंद जळपते, पांडुरंग मिरासे, विजय वाठोरे, अँड. ज्ञानेश्वर पंदलवाड, सुभाष गुंडेकर, स.स.अ.मनान, अविनाश कदम, गौतम राऊत, मनोज पाटील, डॉ.कैलास कानीदे, जयभीम पाटील, डॉ.एस.पी. गोखले, शाहीर बापूराव जमदाडे, पत्रकार सुशील भाऊ भवरे, लोकेश कावळे, रवि राठोड, शाहीर रमेश नारलेवाड, शंकर गायकवाड, डॉ. मनोज राऊत, सिद्धार्थ तलवारे, प्रा. प्रताप नरवाडे, शाहीर माधव वाढवे, संजय गुंडेकर, गणपत नाचारे, प्रताप लोकडे, रमेश सर्फे, वैभव नरवाडे, किशन ठमके, सचिन कांबळे, सूर्यकांत खिराडे, बसवंत कांबळे, सिद्धूभाऊ कवडे, प्रशांत विनायते, परमेश्वर वालेगावकर, शिवाजी डोखळे, शेख खयुम, सुनिल बेदिकर, आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. पुढील भावी सामाजिक कार्यात शुभेच्छा दिल्या आहेत