उस्मानगर, माणिक भिसे। मागील पंधरवड्यातील अवकाळी पावसाच्या विश्रांती नंतर पेरणीपूर्वक खरीप हंगाम शेतीच्या मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात आले असून शेतकरी बी बियाणे खत मिळविण्यासाठी तयारीसाठी लागले आहेत बी बियाणे घेण्यासाठी विविध बँका व सेवा संस्थेकडे कर्ज मिळण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत.


गतवर्षी शेतकऱ्यांना पावसाने योग्य प्रमाणात दिली नसल्याने नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कडधान्य व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. कोरडवाहू जमिनीतील खरीपाची पिके ही पावसावर अवलंबून असतात. पावसाने साथ दिली तर खरीप हंगाम चांगला , आणि पावसाने दगा दिल्यास पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

यावर्षी उन्हाळा अधिक तापल्याने शेतकऱ्याने जमिनीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर व्दारे नांगरणी, कोळपणी, वखरणी उपयोग सुरू केला .त्याच दरम्यान अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने शेतातील कामे तसेच राहून गेले होते. कलंबर बुद्रुक परिसरात अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. मागील आठ दिवसापासून अवकाळी पावसाने विश्रांती दिल्याने शेतकरी शेतामध्ये राब राबताना दिसत आहे. अंगाची लाही लाही सहन करत शेतातील मशागतीचे कानात हातभर लावत आहे. शेतकरी जमिनीतील केरकचरा काढून साफसफाई करून आता शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

एकीकडे काय दिवसातच पावसाळा सुरुवात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केल्याने शेतात लागणारे बी बियाणे खत उपलब्ध करण्यासाठी बाजारात शेतकऱ्यांची वरदळ सुरू झाली आहे गतवर्षीप्रमाणे याही वर्षी खर्च टंचाई जाणवत असल्याने खताच्या शोधात शेतकरी फिरत आहे गतवर्षी पावसाने साथ दिली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा मुकाबला करावा लागत आहे बी बियाणे खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेकडून किंवा सेवा संस्थेकडून कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही म्हणून शेतकरी कर्जासाठी बँकेकडे चकरा मारताना दिसत आहे.

सदा शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे . शेतकरी शेतातील धुरे कापणे , चिपाड वेचणे , जाग्यावर जाळुन टाकणे , शेतात शेणखत टाकणे ,अदी कामे करण्यासाठी व्यस्त झाला आहे. खत बि बियाण्याची भाव गगनाला भिडल्याने शेतकरी हैराण होत आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या कामाचा दामही शेतातून निघत नसल्याने दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होत असून डोक्यावर असलेली कर्ज कसे फेडावे ही चिंता जास्त शेतकऱ्यांना सतावित आहे. मागील महिन्यातच शेवटच्या टप्प्यात अवकाळी पावसामुळे वातावरण बदल्याने शेतकरी पाऊस उघडण्याची वाट पाहत होता. परिसरात नगदी पीक म्हणून हाळद, सोयाबीन,कापुस याकडे लक्ष देत आहे.