देगलूर, गंगाधर मठवाले| येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ शुक्रवार दिनांक ६ रोजी शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा हर्षल्लासात साजरा करण्यात आला. सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या येथील अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून शिवप्रेमींनी वंदन केले.


यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष अँड.अंकुश देसाई देगावकर , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मंगल पाटील देगावकर, जयपाल कांबळे सांगवीकर, उपाध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे, सचिव राजु पाटील मलकापुरकर, कार्याध्यक्ष डॉ. सुनील जाधव, बालाजी पाटील थडके , नितेश पाटील भोकसखेडकर,डॉ. आकाश देशमुख, अँड. रमेश जी जाधव , अनिल कदम , नामदेव थडके , रणजित हिन्गोले , गजानन पाटील मुजळगेकर , शिवा डाकोरे, राहुल थडके ,उमाकांत भुताळे , विशाल जाधव , जनार्दन बिरादार , अच्युत सुर्यवंशी , दत्ता पाटील बामणे , विकास मोरे , राजु पाटील थडके , जयदीप वरखिंडे , चंद्रकांत मोरे ,

शिवाजीराव वरखिंडे, संजय दोमाटे, बालाजी पाटील कुशावाडीकर, माधव पाळेकर ,सुधाकर बोडके, गंगाधर लोणे, देविदास थडके , बाळासाहेब पाटील , प्रदिप सकरगे, शिंदेभाऊ , शहाजी देसाई , आम्रपाली येसगे, संजीवनीताई सुर्यवंशी, मीनाताई सुर्यवंशी , सुरेखाताई लोणे, चैतन्याताई वानखेडे, योजनाताई शिंदे व ईतर शिवप्रेमींच्या उपस्थितीमधे दुग्धाभिषेक करून शिव राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला . कार्याध्यक्ष डॉ. सुनिल जाधव यांनी जिजाऊ वंदना गायन करून मानवंदना दिली . यावेळी शिवप्रेमींनी दिलेल्या शिवाजी महाराजांच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील जाधव यांनी तर उपस्थितांचे आभार मंगल पाटील यांनी मानले.
