हिमायतनगर l येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या 133 व्या जयंती निमित्त ग्रंथ प्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम लाभल्या तर स्टाफ सेक्रेटरी एम.पी गुडाळे हे लाभले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. राजू बोंबले यांनी केले. ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथपाल प्रा राजू बोंबले व ग्रंथालय परिचर श्री विश्राम देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाच्या आध्यक्षा यांनी आपल्या भाषणातून आजच्या युगामध्ये पुस्तकाचे महत्व काय आहे हे सर्वांना पटवून दिले त्याचप्रमाणे विविध उदाहरणे देऊन काळानुरूप व आजची पिढी यासाठी ग्रंथ किती महत्त्वाचे आहेत हे पटवून दिले.



ग्रंथालय ही वधिष्ण संस्था असा संदेश दिला. सदरील कार्यक्रमाला महाविद्यालयातील संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थीनींनी ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद घेतला.




