CIDCO ; अखेर सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त म्हणून डॉ.बेग यांनी पदभार स्वीकारला -.

नवीन नांदेड l नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे तब्बल चार दिवसांनंतर आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त म्हणून डॉ. मिर्झा ‌फरतुल्ला बेग यांची नियुक्ती केली असल्याचे आदेश 18‌ ऑक्टोबर रोजी काढले असून 19‌रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे, अतिरिक्त पदभार मुळे कार्यालयीन कामासह प्रलंबित अनेक कामे खोळंबली जाण्याची शक्यता वर्तवली जात असुन पदभार स्वीकारल्या नंतर तात्काळ कर निरीक्षक व वसुली लिपीक यांच्यी बैठक घेऊन वसुली साठी प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे प्रभारी सहाय्यक आयुक्त व वसुली लिपीक यांनी नाव परिवर्तन संचिका साठी लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ चार दिवसांपूर्वी पकडले होते, यानंतर सहाय्यक आयुक्त हे पद‌ रिक्त होते ,तर कार्यालयीन परिसरात कर्मचारी यांच्या सह नागरीकांच्या शुकशुकाट दिसून आला, तर सहाय्यक आयुक्त पदासाठी जणू स्पर्धा लागली, अखेर तब्बल चार दिवसांनंतर आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी 18ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय कार्यालय 2अशोक नगर चे सहाय्यक आयुक्त फरहत मिर्झा बेग यांची नियुक्ती केली.

बेग यांनी 19रोजी अतिरिक्त सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला यावेळी तात्काळ वसुली निरीक्षक, वसुली लिपीक यांच्यी बैठक घेऊन मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीला‌ प्राधान्य देण्याचे आवाहन केले.यावेळी मात्र कर्मचारी यांनी आणलेले पुष्पगुच्छ घेण्यास नकार दिला. आयुक्त यांनी पुर्णवेळ सहाय्यक आयुक्त म्हणून यांनी नियुक्ती करावी व‌ प्रलबिंत कामांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button