नवीन नांदेड| सिडको परिसरातील मिरानगर, राहुल नगर, शाहूनगर, वाघाळा भागात पंधरा दिवसापासून पाण्याची टंचाई असुन ऐन गणेशोत्सव काळात येथील नागरीकांना पाण्याचा समस्यांना तोंड द्यावे लागत असुन, तक्रारी नंतर काही भागात पाणी पुरवठा विभागाने मोजक्या पाण्याचा टॅंकरने पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र दुरूस्ती नावा खाली यंत्रसामग्री व मनुष्य बळ अभावी दहा तासांचा कामासाठी पंधरा दिवस संबंधित विभागाने घालवला आहे. तात्काळ मनपा प्रशासनाने पाणी समस्या सोडवण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.
सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २० मधील मिरा नगर, शाहू नगर, लिबोनी नगर, वाघाळा परिसरातील मालमत्ता धारकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा वॉल नादुरुस्त झाल्याने गेल्या पंधरा दिवसा पासुन या भागाला पिण्याच्या पाणी पुरवठा बंद झाला. अनेकांनी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा विभागाला तक्रारी केल्या नंतर आठ दहा दिवसांनी काही भागात मोजक्या पिण्याचे टॅकर व्दारे पुरवठा करण्याचा प्रयत्न संबधित विभागाने केला आहे.
मात्र दुरूस्ती नावाखाली अद्यापही यंत्रसामुग्री व मनुष्य बळ अभावी हे काम पंधरा दिवसापासून रेगांळले आहे. संबधित विभागात नव्याने रुजू झालेले अभियंता, ऊप अभियंता, सुपरवायझर हे मुख्यालयातून कारभार पाहत असल्याने दुर्लक्ष झाल्याने नागरीकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.