नांदेड| धनेगावमधून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र.361 मुळे या परिसरातील रहिवाशीयांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागणार असून कायमस्वरूपी अडचणी सोडवण्यासाठी महामार्गाच्या उर्वरित कामास स्थगिती देऊन नवीन प्रस्तावानुसार महामार्गाचे काम करण्यासर संबंधित प्राधिकरणाला आदेशीत करावे अशी मागणी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


आ. मोहनराव हंबर्डे यांनी निवेदनात नमुद केले की,या महामार्गामुळे येणार्या अडचणींबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वेळोवेळी लक्ष वेधले असतानाही संबंधित अधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधित अधिकारी ग्रामस्थांची दिशाभूल करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.धनेगाव येथील स्मशान भूमी ही राष्ट्रीय महामार्ग 361 च्या उत्तरेस आहे आणि गाव पूर्ण दक्षिणेस आहे,त्यामुळे अंत्यविधी प्रसंगी पूर्ण ग्रामस्थ,नातेवाईक यांना अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे नेताना महामार्ग क्रमण करताना तसेच धनेगाव येथील शेती ही राष्ट्रीय महामार्ग 361 च्या उत्तरेस आहे आणि गाव पूर्ण दक्षिणेस आहे.

दैनंदिन शेतीची कामे करायला जाताना शेतकरी, गुरे ढोर प्रत्येकवेळी अडचणी येणार तसेच त्यात महामार्गावरील वाहनांची गती अधिक असल्या कारणाने दुर्घटना होऊन जीवित व वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे. येथे प्राचीन देवस्थान असल्याने भाविकांना दर्शनासाठी जाताना तसेचशाळा महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

गोदावरी नदी ही राष्ट्रीय महामार्ग 361 च्या उत्तरेस आहे आणि दक्षिणेस धनेगाव, बळिरामपूर, नवीन वस्ती असे मिळून 2 ते 4 लाख लोकवस्तीचे आहे त्यांचे सांडपाणी तसेच पावसाचे पाणी नैसर्गिक पाण्याचा पुर्व-पश्चिम आहे, राष्ट्रीय महामार्ग 361 ची व त्या अंतर्गत नालीची ऊंची जास्त आसल्या मुळे नैसर्गिक प्रवाह बंद झाल्या कारणाने पाणी जमा होऊन शासनाचे, ग्रामस्थांचे आर्थिक व जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे.

या परिसरात छोटे मोठे उद्योग आहेत त्यावर रोजंदारी करणारा मोठा गरीब वर्ग आहे. महामार्गामुळे दोन्हीही बाजूस कोणासही जाता येत येणार नाही त्यामुळे सर्व उद्योग बंद पडून मोठी बेरोजगारी होऊन उपासमारीची वेळ गरिबांवर येण्याची दाट शक्यता आहे. या सर्व अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 361 हा धनेगाव फाटा चौरस्ता (एचपी पेट्रोल पंप) ते दूध डेअरी चौकापर्यंत उभ्या पिल्लर वरच्या वर रोड बनवल्यास, खालील रस्ते चालू राहिल्यास वरील सर्व अडचणी दूर होतील. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह गोदावरी नदीस मिळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 361 त्या अंतर्गत नालीची ऊंची जास्त आहे .ती कमी करून पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठे पाइप टाकले जावेत. पाणी न धांवण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे.
सोनखेड येथे अंडरग्राऊंड पूल उभारण्याची मागणी
सोनखेड हद्दीतील बसस्थानक 1 किलोमिटर अंतरावर आहे. नांदेडकडे येणार्या रस्त्याच्या डाव्या बाजूला मस्जिद आहे. लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे व उड्डाणपूलाचे काम सुरू असल्यामुळे मुस्लिम बांधवांना मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जाणे अशक्यप्राय बनले आहे. प्रचंड अडथळा निर्माण होत असल्यामुळे वयोवृद्ध मुस्लिम बांधव यांना मशीद जवळ असतानाही सुमारे दोन किलोमीटर अंतर अकारण पार करावे लागत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी मशिदी समोर बोगदा तयार करावा अशीही मागणी आ. हंबर्डे यंनी एका निवेदनात केली.