Dhanegaon and Sonkhed : धनेगाव व सोनखेड येतील तीन वर्षांपासून रखडलेल्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गाचे काम नवीन प्रस्तावानुसार करा -NNL
नांदेड| धनेगावमधून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र.361 मुळे या परिसरातील रहिवाशीयांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागणार असून कायमस्वरूपी अडचणी सोडवण्यासाठी महामार्गाच्या उर्वरित कामास स्थगिती देऊन नवीन प्रस्तावानुसार महामार्गाचे काम करण्यासर संबंधित प्राधिकरणाला आदेशीत करावे अशी मागणी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आ. मोहनराव हंबर्डे यांनी निवेदनात नमुद केले की,या महामार्गामुळे येणार्या अडचणींबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वेळोवेळी लक्ष वेधले असतानाही संबंधित अधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधित अधिकारी ग्रामस्थांची दिशाभूल करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.धनेगाव येथील स्मशान भूमी ही राष्ट्रीय महामार्ग 361 च्या उत्तरेस आहे आणि गाव पूर्ण दक्षिणेस आहे,त्यामुळे अंत्यव...
