misuse of domestic gas : घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास आल्यास तक्रार द्यावी

gas misuse of domestic gas : घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास आल्यास तक्रार द्यावी

नांदेड| जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारे पॅनिक बुकिंग करु नये. तसेच गॅस एजन्सीच्या बाहेर अनावश्यक गर्दी करण्याची गरज नाही, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

घरगुती गॅसच्या नियंत्रणासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर कंट्रोल रूम तयार करण्यात येत आहे. नागरिकांनी यासंबंधी काही समस्या असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मो. नंबर 8668223326 या व्हॉटसॲप Chat Bot नंबरवर पाठवाव्यात.

नांदेड जिल्ह्यात कोणीही घरगुती गॅसचा गैरवापर, काळाबाजार करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची तक्रार तात्काळ वर दिलेल्या नंबरवर द्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top