CIDCO ; अखेर सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त म्हणून डॉ.बेग यांनी पदभार स्वीकारला -.
नवीन नांदेड l नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे तब्बल चार दिवसांनंतर आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त म्हणून डॉ. मिर्झा फरतुल्ला बेग यांची नियुक्ती केली असल्याचे आदेश 18 ऑक्टोबर रोजी काढले असून 19रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे, अतिरिक्त पदभार मुळे कार्यालयीन कामासह प्रलंबित अनेक कामे खोळंबली जाण्याची शक्यता वर्तवली जात असुन पदभार स्वीकारल्या नंतर तात्काळ कर निरीक्षक व वसुली लिपीक यांच्यी बैठक घेऊन वसुली साठी प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे प्रभारी सहाय्यक आयुक्त व वसुली लिपीक यांनी नाव परिवर्तन संचिका साठी लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ चार दिवसांपूर्वी पकडले होते, यानंतर सहाय्यक आयुक्त हे पद रिक्त होते ,तर कार्यालयीन परिसरात कर्मचारी यांच...
