उस्माननगर, माणिक भिसे| उपविभागीय अधिकारी डॉ. अरुणा संगेवार यांच्या पथकाने येळी (ता. लोहा) शिवारात बुधवारी रात्री अवैध उत्खनन करून वाळूची वाहतूक करणारा एक हायवा महसूल पथकाने पकडला असून पुढील दंडात्मक कारवाईसाठी उस्माननगर पोलीस ठाण्यात सदर वाहन लावण्यात आल्याची माहिती तलाठ्यांनी दिली.


बुधवारी (दि.५) रात्री दहाच्या सुमारास येळी शिवारात अवैध उत्खनन करून वहातूक करणारा हायवा क्रमांक एमएच २६ बीडी ५५०१ हे वाहन पकडले असून चेचीस वरून वाहन नंबर क्रमांकाची खात्री करण्यात आली हे वाहन अंदाजे चार ब्रास वाळूने भरलेले होते. अधिक चौकशी केली असता वाहन चालकाकडे कोणताही वैध परवाना आढळून आला नाही.

त्यामुळे सदर वाहन उस्माननगर पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी लावण्यात आल्याची माहिती ग्राममहसूल अधिकारी मोतीराम पवार यांनी दिली. या पथकात अधिका-यांसमवेत मोतीराम पवार, संतोष अस्कुलकर, राजू इंगळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल निळकंठ श्नीमंगले आदींचा समावेश होता.
