Importance of voting ; मतदानासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना घातले साकडे विद्यार्थ्यांनी पालकांना लिहिले मतदानाचे महत्त्व सांगणारे संकल्पपत्र – NNL

नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्वीप कक्षाच्या वतीने मतदान जनजागृतीचे विविध उपक्रम घेतले जात आहेत. नांदेड-वाघाळा महानगरपालिका वजीराबाद येथील शाळा क्रमांक 1 मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसाठी मतदान संकल्पपत्र लिहिले आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगणारे संकल्पपत्र लिहून आपल्या पालकांना दिले. त्यांना मतदान करण्याचे वचन देण्यास प्रवृत्त केले आहे. यामुळे हा उपक्रम प्रभावी ठरला आहे.

याशिवाय मतदान जनजागृतीसाठी प्रभात फेरी, रॅली यासारखे उपक्रमही घेतले जात आहेत. यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपायुक्त अजितपालसिंग संधू व शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर माहुरे, सर्व शिक्षक व पालकांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button