लाइफस्टाइल

National Mouth Day ; राष्ट्रीय मुख दिनानिमित्त ‘तंबाखूचा पुळका आरोग्याला विळखा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन – NNL

नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंतचिकित्सा विभागाने राष्ट्रीय मुख दिनाचे औचित्य साधून 7 ऑगस्ट रोजी ‘तंबाखूचा पुळका आरोग्याला विळखा’ या विषयावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता . हा कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल] विष्णुपूरी येथे इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाचे प्रमुख उदिष्ट विद्यार्थ्यांना दंत आणि मुख आरोग्याचे महत्व पटवून देणे आणि तंबाखूच्या व्यसनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम समाजावून सांगणे हे होते. यासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. निबंध आणि रांगोळी स्पर्धा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धामध्ये मोठया प्रमाणात उत्साहाने भाग घेतला आणि आपल्या सर्जनशीलतेतून तंबाखूच्या दुष्पपरिणामाचे चित्रण केले.

07 08 2024 1 National Mouth Day ; राष्ट्रीय मुख दिनानिमित्त ‘तंबाखूचा पुळका आरोग्याला विळखा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन - NNL

अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण यांच्या उपस्थितीत विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. दंतशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. भावना भगत, मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला जाधव, श्री. वेद पाठक, डॉ. समीक्षा, डॉ. प्रतीक्षा इ. मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मुख आरोग्याचे महत्व आणि तंबाखूच्या व्यसनाचे गंभीर परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सुशील येमले आणि डॉ. ऐश्वर्या चंद्रण यांनी खेळामध्ये होणाऱ्या इजा आणि त्यांच्यावर कशी काळजी घ्यावी याबाबत व्याख्यान दिले. यामुळे विद्यार्थ्यांना रोजच्या आयुष्यातील आरोग्याविषयक काळजीबद्दल जागरुकता निर्माण झाली.

कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपण करुन झाली. तसेच मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. जे पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचे महत्व अधोरेखित करतात. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन डॉ. अरुण नागरिक यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले आणि विद्यार्थ्यामध्ये मुख आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात या उपक्रमाने मोलाचे योगदान दिले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!