Friday, June 26

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

नांदेड| राम नवमीच्या पावन पार्श्वभूमीवर नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डी येथे २५ मार्च रोजी भव्य साई भक्त संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे.

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी,श्री संत कवी दासगणू महाराज साई भक्त मंडळ उमरी (गोरठे),साईं मानव सेवा ट्रस्ट, साईं धाम ट्रस्ट यांच्या सहकार्याने हे भव्य संमेलन पार पडणार आहे. हे संमेलन सर्व साई भक्तांसाठी खुले असून देशभरातील साई भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे (9823260073) यांनी केले आहे.

या संमेलनासाठी मुंबई, महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या विशाल साई भक्त संमेलनात भजन, पालखी मिरवणूक तसेच साई विचारांची देवाणघेवाण असे विविध भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. साईबाबांच्या “श्रद्धा आणि सबुरी” या संदेशाचा प्रसार करण्यासाठी अशा प्रकारच्या संमेलनांचे मोठे महत्त्व असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. २५ मार्च रोजी च्या या कार्यक्रमात सहभागी होऊन साईबाबांचे आशीर्वाद प्राप्त करावेत, असे आवाहन नानक साई फाऊंडेशनचे उपाध्यक्ष पंढरीनाथ पगार (शिर्डी), सरदार प्रितमसिंघ भाटिया (झारखंड) तसेच जॉइंट सेक्रेटरी सुनील निकम (नाशिक) व पंकज लोढा (शिर्डी) यांनी केले आहे.

साई भक्तांना एकत्र येऊन आपले अनुभव शेअर करण्यासाठी व श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी हे संमेलन एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याचेही नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे () यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!