anganwadi : सातेगाव येथील अंगणवाडीचे छत कोसळले; चिमुकले बालबाल बचावले

नांदेड| जिल्ह्यातील सातेगाव येथे अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे छत अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या घटनेत अंगणवाडीत उपस्थित असलेली लहान मुले व कर्मचारी बालबाल बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडी सुरू असतानाच छताचा काही भाग अचानक खाली कोसळला. घटनेवेळी काही मुले कक्षेत उपस्थित होती, मात्र तत्काळ सावधगिरीने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या घटनेमुळे स्थानिक नागरिक व पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंगणवाडीची इमारत 30 ते 35 वर्षजुनी असून, जर्जर अवस्थेत असल्याने अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नव्हती, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button