Wednesday, May 13

Tag: the children barely escaped

anganwadi : सातेगाव येथील अंगणवाडीचे छत कोसळले; चिमुकले बालबाल बचावले

anganwadi : सातेगाव येथील अंगणवाडीचे छत कोसळले; चिमुकले बालबाल बचावले

नांदेड, व्हिडीओ
नांदेड| जिल्ह्यातील सातेगाव येथे अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे छत अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या घटनेत अंगणवाडीत उपस्थित असलेली लहान मुले व कर्मचारी बालबाल बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडी सुरू असतानाच छताचा काही भाग अचानक खाली कोसळला. घटनेवेळी काही मुले कक्षेत उपस्थित होती, मात्र तत्काळ सावधगिरीने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे स्थानिक नागरिक व पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंगणवाडीची इमारत 30 ते 35 वर्षजुनी असून, जर्जर अवस्थेत असल्याने अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नव्हती, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे....
error: Content is protected !!