Homeक्राईमIlligal pimples ; १५० ब्रासच्या रॉयल्टीवर २ हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन, ठेकेदाराचा...

Illigal pimples ; १५० ब्रासच्या रॉयल्टीवर २ हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन, ठेकेदाराचा प्रताप

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। गौणखनिज तस्करी च्या घटना माहूर तालुक्यात राजरोस पणे घडत असून तालुक्यातील वानोळा शिवारातील एका शेतातून १५० ब्रास मुरूम ची रॉयल्टी घेऊन २ हजार ब्रास पेक्षा जास्त मुरुमाचे उत्खनन झाल्याची घटना उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

IMG 20250316 WA0021 Illigal pimples ; १५० ब्रासच्या रॉयल्टीवर २ हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन, ठेकेदाराचा प्रतापसा.बा. विभाग माहूरच्या वतीने  वानोळा ते मेंडकी या  ३ कि.मी.च्या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून त्याकरिता ५ कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात येत आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरूमची आवश्यकता असल्याने सदरील काम करणाऱ्या ठेकेदाराने वानोळा परिसरातील एका शेतकऱ्यांच्या शेतातून १५० ब्रास मुरूम ची रॉयल्टी भरली, परंतु प्रत्यक्षात मात्र २ हजार पेक्षाही जास्त ब्रास मुरुमाचे उत्खन करून शासनाची दिशाभूल करून महसूल बुडविला असल्याची तक्रार वानोळा येथील सामाजिक कार्यकर्ता पंडीत धुप्पे यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट व तहसीलदार माहूर यांना सादर केलेल्या तक्रारीने उघडकीस आली आहे. 

IMG 20250316 WA0022 Illigal pimples ; १५० ब्रासच्या रॉयल्टीवर २ हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन, ठेकेदाराचा प्रताप

शासनाचा महसूल बुडविणाऱ्या व गौण खनिज चोरी करणाऱ्या संबधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी व सदर अवैध मुरूम उत्खननाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून कर्तव्यात कसून करणाऱ्या संबंधीत तलाठी व मंडळ अधिकारी यांचे विरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनाच्या अनुशंगाने तहसीलदार किशोर यादव यांनी दि.३ मार्च रोजी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी वानोळा यांना सदर अवैध मुरूम उत्खन प्रकरणी स्थळपाहणी करून चौकशी करून  पंचनामा सह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 
                
वानोळा येथील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी इपीएस मोजणी करून पंचनामासह अहवाल तहसील कार्यालयात दोन दिवसात सादर करण्यात  येईल. अशी माहिती वानोळाचे महसूल मंडळ अधिकारी एस.के.साळसुंदर यांनी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments