उस्माननगर। अठराव्या शतकात चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित असलेल्या स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून समाज सुधारणेच्या कार्यामध्ये महत्त्वाची क्रांती करणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांची जयंती दिवस हा बालिका दिन म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लाट खुर्द तालुका कंधार येथे थाटात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्ता गाडेकर हे होते ., तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अनिता दिगंबर इंगोले ( माजी उपसरपंच लाट खुर्द) व शिक्षक वृंद यांच्यासह शाळेतील विद्यार्थिनींनी माता सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा परिधान करून उपस्थित होत्या .यावेळी विशेष आकर्षक ठरले.
सर्वप्रथम माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेतील जवळपास चाळीसच्या आसपास विद्यार्थिनींनी उत्कृष्ट असे सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्र्यावरील भाषण व्यक्त करताना ” मी सावित्रीबाई फुले बोलते ‘ या मनोगताने शाळेचा परिसर मनमोहून गेला . यावेळी श्रद्धा गाडे , शिवान्या पुयड , सह्याद्री इंगोले , आदिती जाधव , श्रुती इंगोले , रूपाली शिंदे , हिंदवी गवारे , रूपाली बाबळे , पूजा इंगोले , यांच्यासह अनेक विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले .
यावेळी अध्यक्ष भाषणात बोलताना श्री गादेकर म्हणाले की , सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्या , त्यामुळे स्त्रिया पुढे आल्या आणि त्यांनी समाज पूर्णपणे बदलून टाकला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन रूढी आणि परंपरा यांना झुंजारून सावित्रीबाई फुले यांनी जे अग्नीदिव्य दिले , त्यामुळेच आज स्त्रिया सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. असे विचार गादेकर यांनी विशद केले. यावेळी ज्या कार्यक्रमासाठी शाळेतील सहशिक्षक ताटे , धूळशेटे , उदबुके , कांदे , सौ. कुलकर्णी मॅडम ,सौ. मोघे मॅडम , आणि दिगांबर इंगोले , हौसाजी गाडे , यांची प्रमुख उपस्थिती होती.