Savitribai Fule ; सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले – मुख्याध्यापक दत्ता गादेकर -NNL
उस्माननगर। अठराव्या शतकात चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित असलेल्या स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून समाज सुधारणेच्या कार्यामध्ये महत्त्वाची क्रांती करणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांची जयंती दिवस हा बालिका दिन म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लाट खुर्द तालुका कंधार येथे थाटात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्ता गाडेकर हे होते ., तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अनिता दिगंबर इंगोले ( माजी उपसरपंच लाट खुर्द) व शिक्षक वृंद यांच्यासह शाळेतील विद्यार्थिनींनी माता सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा परिधान करून उपस्थित होत्या .यावेळी विशेष आकर्षक ठरले.
सर्वप्रथम माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेतील जवळपास चाळीसच्या आसपास विद्यार्थिनींनी उत्कृष्...
