नांदेड। अर्धापूर ते नांदेडकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र 361वर भरधाव चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या ट्रकला जबर धडक दिल्याची घटना दिनांक 15 रोजी सायंकाळी 5 वाजुन 40 मिनिटाने घडली असून, या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोचली असून, अपघाताचा पंचनामा केला आहे.


याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता चार चाकी scorpio वाहन क्रमांक mh 26-AA 7111चा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्य ट्रॅक क्रमांक MH 09GJ 0147 ला डिव्हायडर ओलांडून समोरासमोर जाऊन धडक दिल्याने या अपघातात 1)सय्यद हुशेब वय 32 वर्षं रां पाकीजा नगर नांदेड 2)शेख सलाम वय 30 वर्षं रा पाकीजा नगर नांदेड हे जागीच मयत झाले आहेत.


तर सहा जण जखमी झाले असून, जखमीचे नाव पुढीलप्रमाणे 3)शेख मस्तान शेख जैनुद्दीन वय तीस वर्ष राहणार शाहीन नगर नांदेड 4) सय्यद रियाज सय्यद गौस वय 28 वर्षे राहणार पाकीजा नगर नांदेड 5) सय्यद फजल सय्यद गौस वय 27 वर्ष राहणार पाकीजा नगर नांदेड 6) ननोद्दीन हबीब खान वय 18 वर्षे राहणार पाकीजा नगर नांदेड 7) शेख रिजवान अलीम वय 25 वर्ष राहणार पाकीजा नगर नांदेड 8) शंकर बोडके राहणार पिंपळगाव नांदेड तसेच,सदर मयत तसेच जखमींना लागलीच ॲम्बुलन्स ने शासकीय दवाखाना विष्णुपुरी येथे पोलिसांनी नेण्याची व्यवस्था केली. अपघातग्रस्त चार चाकी वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात एवढा भयावा होता की गाडीचा चौकातून झाला असून जीवित हानी सह मोठे नुकसान झाले आहे.

https://www.instagram.com/share/reel/BACYYF4Z0d

नांदेडच्या भोकर फाटा ते पिंपळगाव राष्ट्रीय महामार्गावरील महादेव फाटा येथे होताहेत वारंवार अपघात!
या महामार्गावर दर दुसऱ्या दिवशी गंभीर अपघात होत असून अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत आहे. मुख्यतः पिंपळगाव आणि साखर कारखाना रस्त्यावरून महामार्ग ओलांडताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते आणि अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
🛑 अपघात होण्याची प्रमुख कारणे:
✅ महामार्गावरून भरधाव वेगाने जाणारी वाहने
✅ गावातून व साखर कारखान्यातून महामार्ग ओलांडताना वाहतुकीचा अनियंत्रित प्रवाह
✅ अपुऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजना
🚧 त्वरित उपाययोजना आवश्यक! 🚧
👉 पिंपळगाव व साखर कारखाना रस्त्यांवरून महामार्गाकडे येणारे रस्ते तातडीने बंद करावेत.
👉 या ठिकाणी बॅरिकेड्स व वेग नियंत्रणासाठी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवावेत.
👉 विविध ठिकाणी मोठ्या सूचना फलकांद्वारे लोकांना सतर्क करण्यात यावे.
👉 महामार्ग ओलांडण्यासाठी उड्डाण पूल किंवा अंडरपास यासारखे पर्याय विचारात घ्यावेत.
🚨 प्रशासनाने वेळीच पाऊले उचलली नाहीत, तर अनेक निष्पाप लोकांचा बळी जात राहील. कृपया त्वरित योग्य कारवाई करावी! 🚨
#nandednewslive #नांदेड #newpost #nnlmarathi #himayatnagar #wadhonanews #newsflash360 #police #accident #mahadevpimplgaon #ardhapurroad #nationalhighway
https://www.instagram.com/share/reel/BAL2rHhU8W