Motorcycle hits truck : मोटरसायकलची उभ्या ट्रकला मागून धडक; दोघे जागीच ठार, एक गंभीर
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर तालुक्यातून गेलेल्या धनोडा–कोठारी राष्ट्रीय महामार्गावर वाई बाजार जवळील वाघाई टेकडी परिसरात उभ्या ट्रकला मोटरसायकलची मागून जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील तिघांपैकी दोघे जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवार दि. २३ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
वाघाई टेकडीजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बीकेसी कंपनीच्या ट्रक (क्रमांक एपी ३९ यूएक्स ६८७६) ला मोटरसायकल (क्रमांक एमएच २६ वायएफ ४२३८) ची मागून जोरदार धडक बसली. मोटर सायकलवर आसोली साईनगर येथील तरुण विठ्ठल राठोड (वय ३०), दहा वर्षीय अर्जुन विठ्ठल राठोड तसेच आंध्रप्रदेशातील अंदाजे ६५ वर्षीय वयोवृद्ध असे तिघे प्रवास करीत होते. हे तिघे आसोलीहून लसनवाडी येथे जात असताना हा अपघात घडला. अपघातात विठ्ठल राठोड व सोबत असलेले वयोवृद्ध यांना डोके, तोंड...

