भास्करराव पाटील खतगाव कर यांनी पीडित कुटुंबीयांना प्रत्यक्ष आर्थिक मदत करून भविष्यात येणाऱ्या अडचणीतही सोबत असल्याचे आश्वासन दिले. बिलोली तालुक्यातील मिनकी येथील शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार यांचा ओंकार राजेश पैलवार हा मुलगा बाहेर गावी शिक्षणास होता. गत तीन चार दिवसांपुर्वी तो मकर संक्रांतीच्या सना निमित्त गावाकडे आला होता.

संक्रांतीचा सन असल्याने ओंकार याने आपल्या वडिलांकडे नवीन कपडे व मोबाईल घेण्यासाठी पैशाची मागणी केल्याचे कळाले. यावेळी राजेंद्र पैलवार यांनी सततची नापीकी, बॅकेचे कर्ज आणि वाढते शैक्षणिक खर्च यामुळे आता माझ्याकडे पैसे नाहीत आपण कपडे व मोबाईल नंतर घेऊ असे सांगितले होते.यामुळे नाराज झालेला ओंकार हा घरातुन बाहेर पडला.

दि.९ रोजी सकाळी राजेंद्र पैलवार हे मुलाचा शोध घेत असताना ओंकार याचा म्रतदेह शेतातील लिंबाच्या झाडाला लटकल्याचे दिसून आल्यानंतर मुलाने गळफास घेतलेल्या दोरीने पित्याने ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली होती. या घटनेमुळे बिलोली तालुक्यातही संबंध नांदेड जिल्हा हादरला होता. अल्पभूधारक शेतकऱ्यास आपल्या गरिबीमुळे मुलासह आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे कळतात नांदेड माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी दिनांक 12 जानेवारी रोजी मिनकी येथील पैलवार कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे सांत्वन करत य माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पीडित कुटुंबास तात्काळ 50 हजार रुपयाची आर्थिक मदत केली तर विद्यमान खासदार रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन सांत्वन केले.
